स्मारकासाठी सेना समर्थ,शिंदेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

स्मारकासाठी सेना समर्थ,शिंदेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

  • Share this:

shinde vs fadanvis17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. पण त्यांच्या स्मारकारवरून राजकारण सुरू झालं आहे. आम्ही बाळासाहेबांचं स्मारक बांधण्यासाठी समर्थ आहोत असं प्रत्युत्तर सेनेचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती. तर आघाडी सरकारनेही त्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. पण शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृती उद्यान उभारण्यात आलं पण स्मारकाचा प्रश्न अजूनही रखडलेला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीपार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं स्मारक उभारणार आणि त्यासाठी एक समिती नेमणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पण बाळासाहेबांचं स्मारक उभारायला शिवसेना समर्थक आहे, असं शिवसेना नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सेनेचेच आमदार सुनील प्रभू यांनी स्मारकाच्या घोषणेचं स्वागत केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2014 09:20 PM IST

ताज्या बातम्या