श्रीनिवासन यांना क्लीन चिट; मय्यपन, कुंद्रा अडकले

श्रीनिवासन यांना क्लीन चिट; मय्यपन, कुंद्रा अडकले

  • Share this:

n srinivasan17 नोव्हेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना दिलासा मिळालाय. मुदगल समितीचा अहवाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आलाय. या अहवालानुसार श्रीनिवासन यांना क्लीन चिट मिळाली आहे. श्रीनिवासन यांचा या मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभाग नसल्याचं मुदगल समितीने स्पष्ट केलं. तर गुरुनाथ मय्यप्पनवर बेटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तर राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा हेसुद्धा बुकीजच्या संपर्कात होते आणि त्यांनी काही मॅचमध्ये बेटिंग केलं होतं असंही जस्टिस मुदगल यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाला आज वेगळं वळणं मिळालं. सुप्रीम कोर्टाने अहवालात चार जणांना नाव जाहीर केली होती. यात बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यासह आणखी दोघांची नाव प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण आज मुदगल समितीच्या अहवालाने श्रीनिवासन यांना दिलासा दिलाय. श्रीनिवासन यांना क्लीन चिट देण्यात आलाय. पण आचारसंहितेचा भंग होतोय हे माहित असतानाही श्रीनिवासन यांनी काहीही केलं नसल्यामुळे अहवालात त्यांच्यावर ताशेरे ओढले गेले आहेत. इतकंच नाही तर त्यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पनवर बेटिंग केल्याचा ठपका ठेवला गेलाय. गुरुनाथ मय्यप्पन हा काही व्यक्तींच्या संपर्कात होता, ज्या व्यक्ती काही बुकीजच्या संपर्कात होत्या असंही या अहवालात म्हटलं गेलंय. तर राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा हेसुद्धा बुकीजच्या संपर्कात होते आणि त्यांनी काही मॅचमध्ये बेटिंग केलं होतं असंही जस्टिस मुदगल यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सीओओ (COO) सुंदर रमन हे काही बुकीजच्या संपर्कात होते. आणि त्यांनी आयपीएलच्या एका हंगामात तब्बल 8 वेळा बुकीला संपर्क केल्याचंही मुदगल समिती अहवालात म्हटलं गेलंय. त्यामुळे सुंदर रमन यांच्यावर आता प्रश्निचिन्ह निर्माण झालंय. तर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम्सच्या भवितव्यावरही आता प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय.

Follow @ibnlokmattv

First published: November 17, 2014, 4:40 PM IST

ताज्या बातम्या