'त्या' 9 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या नरबळी

'त्या' 9 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या नरबळी

  • Share this:

rupesh_mule15 नोव्हेंबर : वर्धा जिल्ह्यातील आर्वी नाका परिसरातील राहणार्‍या वडार वस्ती मधील रूपेश मुळेचा हत्या प्रकारणानं आज वेगळं वळण घेतलंय. रुपेश मोरेच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या रिक्षाचालक आसिफ शाह वल्द मुन्ना पठाण याने नरबळी घेतल्याची कबुली दिली आहे.

आर्वी नाका परिसरातील वडार झोपडपट्टी येथील रूपेश हिरामण मुळे या 9 वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत 4 दिवसांपूर्वी सापडला होता. शनिवारी सायंकाळी रूपेश घरून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना अचानक रविवारी सकाळी गांधीनगर परिसरातील विकास विद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या कचर्‍याच्या ठिकाणी त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला होता. त्याचे काही अवयव बेपत्ता असल्याने नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्याची हत्या करण्यात आल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. शहर पोलीस कुत्र्याच्या वा कोल्ह्याच्या हल्ल्यात त्याची हत्या झाल्याचा तर्क लावण्यात व्यस्त असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले आहे. आसिफ शाह वल्द मुन्ना पठाण असं या संशयिताचं नाव आहे. यवतमाळ येथील रहिवाशी असणारा आसिफ दीड वर्षापासून वर्धेत राहत होता.पोलीस चौकशीत अगोदर उडावाउडवीची उत्तर दिल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच आसिफ पोपटासारखा बोलू लागला. आपणच रुपेशची नरबळी दिली अशी कबुली आसिफने दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2014 09:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading