मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात मांडा -ओवेसी

मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात मांडा -ओवेसी

  • Share this:

Asaduddin Owaisi mim15 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडावा, अशी मागणी एमआयमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी केलीय. काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाची घाई केली आणि वकिलांनीही कोर्टात व्यवस्थित बाजू मांडली नाही त्यामुळे हा घोळ झाला असा आरोपही ओवेसी यांनी केलाय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी पाथर्डी येथील जवखेडा दलित हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांनी भेट घेतली. जवखेड्यातील दुर्घटनेस काँग्रेसच जबाबदार आहे जर या पूर्वीच्या दुर्घटनामध्ये आरोपींना शिक्षा झाली असतं तर असा प्रकार पुन्हा झाला नसता त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. त्यानंतर ओवेसींनी आपला मोर्चा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे वळवला. ज्यावेळी काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला तेव्हा आणि सुशीलकुमार शिंदेंना एमआयएम देशद्रोही वाटली नाही का ? असा सवालही ओवेसीनं केलाय. येत्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेच्या विरोधातही उमेदवार देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आणि या प्रकरणी काँग्रेसनं आपल्या भूमिकेचा खुलासा करण्याचं आव्हान त्यांनी केलंय. अब्दुल सत्तार जोकर असल्याची विखारी टीका करत काँग्रेसच्या धर्मनिर्पेक्षतेचाही बुरखा फाडलाय. काँग्रेस काय धर्मनिर्पेक्षतेचा शिक्का मारणारा नोटरीचा स्टॅम्प आहे का असा खोचक सवालही त्यांनी केलाय. तर येत्या काळात भडकाऊ भाषणं न देता संरचनात्मक आणि विकासाचा अजेंडा घेऊन काम करणार असल्याचंही ग्वाहीही त्यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

First published: November 15, 2014, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading