अवकाळी पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

अवकाळी पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

  • Share this:

avkali rain15 नोव्हेंबर : राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत सापडला आहे. मुंबई, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भात तूर, कापूस, संत्री तर पश्चिम महाराष्ट्रातल्या भात,भूईमूग, सोयाबीनच्या पिकांचं नुकसान झालंय. वर्षभर ज्या पिकांसाठी राब-राबलो, ते पीक डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय.

बळीराजाच्या डोळ्यात पाणी

अमरावती जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी पाऊस व गारपीट झाली, या पावसामुळे संत्री, कापूस व तुर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले, वर्षभर राबल्यानंतर हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपिटिमुळे संत्रा पुर्णपणे गळुन पडला आहे तर जो थोडाफार झाडावर आहे. त्याला गारांचा मार लागल्याने तेही संत्रे पडण्याच्या तयारीत आहे. अनेक शेतकर्‍यांला 3 लाख तर कुणाला 4 -5 लाखाला व्यापार्‍यांनी संत्रे मागितली होती. पण अचानक आलेल्या पावसाने गारपिटीने एका रात्रीत शेतकर्‍यांना रस्त्यावर आणून ठेवलंय. यामुळे बँकेचे कर्ज, मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न कसे करावे या विंवचनेत शेतकरी आहे.

मराठवाड्यात पिकांना जीवदान

मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून काही ठिकाणी पावसानं हजेरी लावलीय. शुक्रवारी रात्रीपासून औरंगाबाद परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे.जालन्याच्या काही भागातही पावसानं हजेरी लावलीय. खूप मोठा पाऊस नसला तरी या पावसानं रब्बीच्या पिकांना काही अंशी जीवदान मिळण्याची शक्यता आहे. शेतीत पिक नसल्यानं या पावसानं शेतीचं नुकसान होणार नाही. मात्र ज्यांनी कापूस किंवा बाजरी काढली नाही त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्वारी, गहू आणि हरबर्‍याला पावसाचा फायदा होईल. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानं जमिनीची ओल जास्त दिवस टिकेल.याचा फायदा पेरलेल्या पिकांना अंकुरण्यासाठी होईल असा कयास शेतकर्‍यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

First published: November 15, 2014, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading