नालासोपार्‍यात इमारतीमध्ये स्फोट, 2 गंभीर जखमी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2014 02:04 PM IST

नालासोपार्‍यात इमारतीमध्ये स्फोट, 2 गंभीर जखमी

nalasopara balst15 नोव्हेंबर : नालासोपारा पूर्व एम.डी.नगरमध्ये एका इमारतीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात सात जण जखमी झाले असून दोघांची प्रकृत्ती  गंभीर जखमी झाली आहे. जखमींना जवळच्याच आलायन्स रुग्णालयात दाखल केले आहे. घटना घडताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळावर पोहचून चौकशी सुरू आहे. हा स्फोट कशामुळे झाला हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

नालासोपारा पुर्व एम.डी. नगर येथील महालक्ष्मी आपार्टमेंट मधील बि विंगच्या तळमजल्यावर सकाळी साडे नऊ वाजता हा स्फोट झाला आहे. अचानक झालेल्या स्फोटात महालक्ष्मी अपार्टमेंट मधील तळमजल्यावरील सात ते आठ घरांच्या काचा, दार, खिडक्या तुटून पडल्या आहेत. घरातील सात महिला, पुरुष व मुलांच्या अंगाला खाचा लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट हा बि विंगच्या तळमजल्यावर झाला परंतु बाजुच्या ए आणि सी विंग मधील घरांचे नुकसान झाले आहे. स्फोटाची तिव्रता इतकी मोठी होती की आजुबाजूच्या दोन ते तीन सोसायटीच्या घरांनाही नुकसान झाले आहे. या स्फोटात कोमल गुप्ता आणि प्रमोद पांडे यांची प्रकृत्ती गंभीर आहे. त्यांच्यावर पूर्व अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळासह जखमींची भेट घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2014 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...