मोदी, 'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!' - ओबामा

मोदी, 'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!' - ओबामा

  • Share this:

modi-obama_1_0_0_0_0_0_0_0

13  नोव्हेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची बुधवारी भेट झाली. या भेटीदरम्यान ओबामा यांनी मोदी यांचा 'मॅन ऑफ ऍक्शन' असा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या म्यानमारच्या दौर्‍यावर आहेत. आज संध्याकाळी ते ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. काही वेळापूर्वीच त्यांनी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांची भेट घेतली. त्यानंतर ते चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि अध्यक्ष झी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते भारत-चीन सीमावादाचा प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. मोदींनी काल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचीही भेट घेतली. तेव्हा ओबामा यांनी त्यांना 'मॅन ऑफ ऍक्शन' म्हणत त्यांच्या कामाचं कौतुक केलं. याबाबत परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी ट्विट केलं आहे. तसंच त्यांनी काल म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांचीही भेट घेतली. आज ते म्यानमारमधल्या भारतीय लोकांनाही भेटणार आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: November 13, 2014, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading