15 नोव्हेंबरपासून मध्ये रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

  • Share this:

Mumbai Local

13  नोव्हेंबर : सततचे होणारे छोटेमोठे अपघात आणि वाढती गर्दी अशी ओळख असलेल्या मध्य रेल्वेचं नवीन वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. यात नव्या फेर्‍यांची भेट नसली तरी मध्य रेल्वे आता सुसाट धावणार आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक ऑक्टोबरऐवजी 15 नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे.

मध्ये रेल्वेच्या सेवा विस्तार आणि ट्रेन्स वेळेवर धावाव्यात यासाठी वेळापत्रकात विशेष बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे फास्ट लोकलचा वेग 100 किमी प्रतितास झाल्याचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वेवर 825 लोकल फेर्‍या होतात. या लोकलमधून दररोज 44 हजार 572 किमी अंतर कापले जाते. नव्या वेळापत्रकानुसार यापुढे 648 किमी जास्त म्हणजे 45 हजार 220 किमी एवढे अंतर कापले जाणार आहे.

दरम्यान, नव्या वेळापत्रकानुसार रात्री 12.38 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जतला जाणारी शेवटची गाडी 12.30 वाजता रवाना होणार आहे. त्यामुळे शेवटची गाडी पकडण्यासाठी आता प्रवाशांना अजूनचं घाई करावी लागणार आहे. त्याचबरोबर शेवटची गाडी चुकली तर पहाटेच्या पहिल्या गाडीची वाट पाहण्याच्या वेळेतही करण्यात आली आहे. आता सीएसटीहून कसार्‍यासाठी सुटणारी पहिली गाडी ही पहाटे 4.05 ऐवजी 4.12ला सुटणार आहे. कल्याण गाड्यांच्या फेर्‍यांची संख्या 410 वरून वाढवून 423 करण्यात आली आहे.

- 12 डब्यांच्या गाड्यांच्या 809 फेर्‍या

- 15 डब्यांच्या गाड्यांच्या 16 फेर्‍या

- लोकल्सच्या फेर्‍यांमध्ये वाढ

- लोकल्सच्या वेगात वाढ

- पहिली लोकल - मुंबई - कसारा सकाळी 4:12

- शेवटची लोकल - मुंबई - कर्जत मध्यरात्री 12:30

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 11:20 AM IST

ताज्या बातम्या