'महाभारत' मालिकेचे निर्माते रवी चोप्रा यांचं निधन

'महाभारत' मालिकेचे निर्माते रवी चोप्रा यांचं निधन

  • Share this:

ravi chopra12 नोव्हेंबर : 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेचे निर्माते आणि 'द बर्निंग ट्रेन', 'बागबाग', 'बाबूल',या सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते रवी चोप्रा यांचं आज (बुधवारी) निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून चोप्रा कॅन्सरशी लढा देत होते त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रवी चोप्रा यांनी बी.आर. फिल्म्सच्या माध्यमातून जमीर, द बर्निंग ट्रेन, मजदूर, दहलीज, बागबान, बाबूल या सिनेमांची निर्मीती केली. मल्टिस्टारर 'द बर्निंग ट्रेन' हा सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या जोडीला घेऊन निर्माण केलेल्या बागबान या सिनेमानंही मोठी प्रशंसा मिळवली. पण रवी चोप्रा यांचं नाव खर्‍या अर्थानं घरोघरी पोहोचलं ते महाभारत या मेगासिरीयलमुळे..1988 ते 90 या कालावधीत दूरदर्शनवर ही सिरीयल सुरू होती. भारतीय प्रेक्षकांवर या सिरीयलनं अक्षरशः गारुड घातलं होतं. त्यानंतर जगात अनेक देशांत वेगवेगळ्या भाषांमध्ये ही सिरीयल दाखवण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

First published: November 12, 2014, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading