जवखेड तिहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी -अण्णा हजारे

जवखेड तिहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी -अण्णा हजारे

  • Share this:

anna_in_javkhed11 नोव्हेंबर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जवखेड तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. ही घटना मानवतेला कलंक लावणारी आहे. या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली.

अहमदनगरमधल्या जवखेड तिहेरी हत्याकांडाला आज 19 दिवस उलटले. पण, ना आरोपी सापडले आणि तपासातही फारसं निष्पन्न झालेलं नाही. या पीडित कुटुंबीयांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनीे आज (मंगळवारी) भेट दिली. अण्णांनी या हत्याकांडाचा निषेध केला. ही घटना मानवतेला कलंक आहे. आरोपींना अजून पकडण्यात आलेले नाही. फक्त दलितांची हत्या झाली हे कुणी केलं हे स्पष्ट झालं नाही पण सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि नेत्यांनीही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे करू नयेत असं आवाहनही अण्णा हजारे यांनी केलं. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिज े. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. तसंच यापुढे समाजात गैरसमज पसरवला जाईल असं वक्तव्य कुणी करू नये असं आवाहनही अण्णांनी केलं.

Follow @ibnlokmattv

First published: November 11, 2014, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading