ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगला काळं फासलं

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगला काळं फासलं

  • Share this:

thane_poster09 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपदरम्यानच्या सत्तासंघर्षाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारं होर्डिंग लावलंय. त्यात फडणवीस यांच्या छबीला अज्ञात व्यक्तींनी काळं फासलं. त्यामुळे ठाण्यात तणाव पसरला.

केंद्रातल्या मोदी सरकारचा रविवारी होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला दुजाभाव दिल्याने याचा संताप सर्वत्र व्यक्त झाला.ठाण्यातही याचे पडसाद उमटले. ठाण्यातले शिवसैनिक भाजपचा निषेध करत असल्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्यात.

ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर निवडून आल्याने आधीच गड हातून गेल्याची सेनेला खंत असतानाच असा प्रकार घडल्याने संशयाची सुई शिवसेनेकडे वळली आहे.

शिवसैनिकांनी भाजप मुख्यालयासमोर फटाके फोडले

दुसरीकडे ठाण्यातच खोपट परिसरातल्या भाजप मुख्यालयासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन करून फटाके फोडुन ढोल ताशाचा गजर केला. पेढे वाटून शिवसेनेच्या एकटे विरोधात जाण्याच्या भूमिकेचे स्वागत कार्यकर्त्यांनी केले. या वेळी आंदोलन करणार्‍या 25 कार्यकर्त्यांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा निषेध करून कार्यकर्त्यांनी शिवसेनच्या घोषणा दिल्या त्या नंतर पोलिसांनी त्यांना सोडून देण्यात आले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading