मनसेमध्ये उलथापालथ सुरूच, दरेकर-गीतेंची नाराजांसोबत गुप्त बैठक

मनसेमध्ये उलथापालथ सुरूच, दरेकर-गीतेंची नाराजांसोबत गुप्त बैठक

  • Share this:

mns_raj_vs_darekar_08 नोव्हेंबर : मनसेमधल्या नाराजांचे राजीनामे स्वीकारल्यानंतरही नेत्यांचं नाराजीनामा सत्र सुरूच आहे. प्रवीण दरेकर, वसंत गीते यांनी आपल्यापदाचे राजीनामे दिल्यानंतर डोंबिवलीत एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीला परभणी, उस्मानाबाद, बुलडाणा, जालना, जळगाव, नाशिक इथले नाराज जिल्हाध्यक्ष हजर होते. या सर्वांनी पराभवाचं खापर बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्यावर फोडलं. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत मनसेमध्ये आणखी पडझड होण्याची शक्यता आहे.

आज मनसेचे माजी आमदार प्रविण दरेकर रमेश पाटील आणि वसंत गिते आणि काही मनसेच्या जिल्हाध्यक्षांची डोंबिवली येथील रमेश पाटील यांच्या आर आर बॅन्क्वीट हॉटेल येथे गुप्त बैठक झाली. या बैठकीला मनसे पदाधिकारी ज्यांनी राजीनामे दिलेत ते उपस्थित होते. यासर्व कार्यकर्त्यांचे मत आहे की, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न दाखवले होते. पण राज ठाकरे यांच्या सोबत असणारे माजी आमदार बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर या दोघांमुळे पक्षाची दुरावस्था झाली आहे आणि त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडनुकीत पक्षाला दारुण पराभव पत्कारावा लागला. यांना जर दूर केले नाही म्हणून आम्ही ादाचा राजीनामा दिला असा सूर नाराजांनी लगावला. आता मनसेच्या परभणी, उस्मानाबाद, बुलडाणा, जालना, जळगाव, नाशिक इथल्या मनसे जिल्हाध्यक्षांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. आणखी काही जिल्हाध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांच्या राजीनामे स्वीकारले आहे. अशा परिस्थिती माझ्यासोबत कोण कोण आहे हे तरी कळेल असंही भावनिक मतही त्यांनी व्यक्त केलं. याच पार्श्वभूमीवर सोमवारी आपण राज ठाकरे यांच्यासोबत आहोत हे दाखवण्यासाठी मनसैनिकांनी कृष्णकुंजवर जमा होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेत काय घडामोडी घडताय हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

First published: November 8, 2014, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading