कल्याणजवळ खोणी गावात 200 जणांना अन्नातून विषबाधा

कल्याणजवळ खोणी गावात 200 जणांना अन्नातून विषबाधा

  • Share this:

kalyan08 नोव्हेंबर : कल्याण येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणातील दुधी हलवा खाल्ल्याने शंभरहून अधिक गावकर्‍यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा घटना समोर आली आहे. यात तब्बल 200 गावकर्‍यांना विषबाधा झाली, ज्यात लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. आता सर्व गावकर्‍यांची प्रकृती स्थिर आहे.

खोणी गावातील बाळाराम मारुती म्हात्र यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने शुक्रवारी खोणी गावात त्यांचा तेरावा पार पडला. या तेराव्याच्या जेवणामध्ये गोड म्हणून म्हात्रे यांच्या नातेवाइकानी दुधी हलव्याची ऑर्डर दिली होती. कल्याण येथील स्वागत स्वीट मार्ट या दुकानदाराला 200 किलो दुधी हलवा 800 बॉक्समध्ये भरून देण्याची ही ऑर्डर देण्यात आली होती. मात्र तेराव्याच जेवण जेवल्यानंतर दोन ते तीन तासानंतर जेवण जेवलेल्या गावकर्‍यांना उलटी,जुलाब आणि मळमळ हे त्रास होऊ लागले. संध्याकाळी गावात सर्वाना हा विष बाधेचा प्रकार असल्याच समजलं. लागलीच ज्यांना त्रास होत होता त्याना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात, निलजे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि अनेक खाजगी रुग्णालयात गावकरी दाखल होऊ लागले. या प्रकाराबाबत स्वागत स्वीट मार्ट या दुकान मालकावर कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व गावकर्‍यांची प्रकृती आता चांगली असून, प्राथमिक उपचार करून सर्वच बाधित लोकांना रात्री उशिरापर्यंत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. सदर प्रकार रात्री नऊ दहाच्या दरम्यान कल्याण तहसीलदार यांना समजल्यावर रात्री अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात एक वैद्यकीय टीम पाठवून ज्यांना बाधा जाणवत आहे. त्यांना लागलीच उपचार देण्याची सोय करण्यात आली. या टीम ने रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान 70 हून अधिक बाधित लोकांना औषधे दिली .

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2014 01:08 PM IST

ताज्या बातम्या