सेना पेचात, भाजपकडून विस्ताराबाबत निरोप नाही

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2014 10:30 PM IST

amit shah meet udhav07 नोव्हेंबर : अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी ठरला आहे. रविवारी दुपारी 1 वाजता नव्या केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी संबंधित नेत्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आलेले आहेत. पण सेनेला याबद्दल फोनच न आल्यामुळे शिवसेनेपुढे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय.

राज्यात सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला होता. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सेनेला गुरुवारी पंतप्रधान कार्यालयातून फोन गेला होता. खुद्द भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. पण त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केंद्रातलं मंत्रिपद स्वीकारायचं की राज्यात विरोधी बाकावर बसायचं हा पेच सेनेला पडलाय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सहभागी होणार की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2014 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...