सुरक्षेची ऐसी तैसी, शपथविधीत ही व्यक्ती पोहचली कशी ?

सुरक्षेची ऐसी तैसी, शपथविधीत ही व्यक्ती पोहचली कशी ?

  • Share this:

security breached during CM Devendra Fadnavis swearing07 नोव्हेंबर : फोटो काढण्याची हौस कुणाला नसते पण सुरक्षाव्यवस्था पायदळी तुडवून आपली हौस भागवणार महाभाग नुकता कॅमेर्‍यात कैद झालाय आणि तोही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात. अनिल मिश्रा असं हे या महाभागाचं नाव आहे. शपथविधीला असलेला कडेकोड बंदोबस्त भेदून मिश्रा व्यासपीठावर पोहचलाच नाहीतर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासोबत फोटोही काढला.

मागील महिन्यात 31 ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवर भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराज्याभिषेक थाटात पार पडला. देशभरातील अनेक मान्यवरांनी या शपविधीला हजेरी लावली होती. या शपथविधीला सर्वच स्तरातील मान्यवरांनी निमंत्रित करण्यात आलं होतं. पण ऐनेवेळी सुरक्षेच्या कारणास्तव काही मान्यवरांना शपथविधीला हजर राहता आलं नाही. अभिनेते नाना पाटेकर यांनाही याचा फटका बसला. नानांनी अखेरीस कंटाळून माघारी परतले. जिथे दिग्गजांना जाता आलं नाही पण तिथे एका महाभागाने पोहचण्याचा पराक्रम केलाय. त्याचा या पराक्रमाची धक्कादायक गोष्ट मुंबई पोलिसांच्या लक्षात आलीये. मुंबई भाजपच्या बिहार सेलमधला स्वघोषीत सदस्य असलेला अनिल मिश्रा हा भाजपच्या बड्या नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसलाय. अनिल मिश्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यासोबत फोटोही काढलेत. इतकंच नाही तर शपथविधी सोहळा सुरू असतानाही अनिल मिश्रा व्यासपीठावर दिसला होता. धक्कादायक म्हणजे या अनिल मिश्रांचं नाव व्यासपीठावर किंवा व्हीव्हीआयपी अशा कोणत्याही यादीत नव्हतं, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. इतकंच नाही तर अनिल मिश्राला प्रवेशाचा पासही देण्यात आला नव्हता, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

First published: November 7, 2014, 4:07 PM IST

ताज्या बातम्या