...नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू, ओवेसींचा प्रणिती शिंदेंना इशारा

...नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू, ओवेसींचा प्रणिती शिंदेंना इशारा

  • Share this:

mim asaduddin owaisi vs praniti shinde06 नोव्हेंबर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमला देशद्रोही म्हटलं होतं. यावरून आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. प्रणिती शिंदे यांनी वक्तव्य मागे घ्यावं नाहीतर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा ओवेसी यांनी दिलाय.

"एमआयएम ही संघटना आणि त्यांचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असल्यानं अतिरेकी आणि एमआयएम संघटनेत फारसा फरक नाही", असं वादग्रस्त विधान सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केलं होतं. एमआयएम संघटना ही कोणत्या समाजाच्या विरोधात आहे किंवा ती कोणत्या धर्माबद्दल काम करते याबद्दल मी बोलत नाही. पण ते देशाच्या विरोधात बोलातायत. त्यामुळे अशा देशविरोधी वक्तव्य करणार्‍यांना देशात जागा नसावी असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. शिंदे यांच्या विधानामुळे एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी थेट इशारा दिलाय. आमची भाषणं जर आक्षेपार्ह वाटत असतील तर पोलिसांकडे तक्रार करावी. यूपीए सरकार असतांना आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी प्रणिती शिंदे कुठे होत्या ? त्यावेळी त्यांनी आमचा विरोध का केला नाही. असा सवाल विचारात विधान मागे घ्यावं अन्यथा बदनामीचा खटला दाखल करू असा इशारा ओवेसी यांनी दिला.

काय म्हणाल्या होत्या प्रणिती शिंदे पाहा हा व्हिडिओ

Follow @ibnlokmattv

First published: November 6, 2014, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading