'त्या' प्रेमी युगुलाची हत्या ऑनर किलिंग,वडिलांनाचीच दिली होती सुपारी

'त्या' प्रेमी युगुलाची हत्या ऑनर किलिंग,वडिलांनाचीच दिली होती सुपारी

  • Share this:

nanded_honor killing06 नोव्हेंबर : नांदेडमध्ये झालेल्या प्रेमियुगुलाच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झालाय. ऑनर किलिंगची ही घटना समोर आलीये. मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध होता म्हणून तिच्या वडिलानेच सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणले होते. दोन महिन्यापूर्वी माहुरच्या रामगढ किल्यावरील निर्जन स्थळी प्रेमीयुगुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह, काका आणि चुलत भावाला अटक करण्यात आलीय.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे हे प्रेमीयुगुल होते. शाहरुख खान आणि निलोफर बेग हे प्रेमीयुगुल माहुरच्या रामगढ किल्यावर फिरण्यासाठी आले होते. किल्यातील निर्जनस्थळी दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी रघु डॉन या प्रमुख आरोपीसह एकूण 6 जणांना अटक केली होती. सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मयत निलोफर बेग हिच्या वडिलांनीच सुपारी दिल्याचे आरोपींनी कबुल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. निलोफरच्या प्रेमप्रकरणास तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्यातूनच दोघांनाही संपवण्यासाठी निलोफरचा वडिलांनी 5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं. निलोफरचे वडील मिर्झा खालेद बेग यांच्यासह मयत मुलीचे काका नवाब जानी आणि चुलत भाऊ विखार अहेमद यांना पोलिसांनी अटक केलीये. मयत प्रेमीयुगुल दोघेही एकाच समाजातील होते. तरीही या प्रेमप्रकरणाला विरोध होता आणि त्यातून हे हत्याकांड घडल्याचं स्पष्ट झाल्यामुळे एकच खळबळ उडालीये.

Follow @ibnlokmattv

First published: November 6, 2014, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading