डेंग्यूबाबत उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2014 03:44 PM IST

डेंग्यूबाबत उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

cm on dengue

06 नोव्हेंबर : राज्यभरात डेंग्यूचं थैमान सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री आरोग्य खात्याच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी सुजाता सोनिक यांच्याकडून डेंग्यूच्या राज्यातल्या स्थितीबाबत माहिती घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. मुख्य म्हणजे जनजागृती करण्यावर भर द्या अशा सूचना त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

राज्यात धुळे शहरात डेंग्यूने दुसरा बळी घेतला आहे. पंधरवड्यात शहरात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाची वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच बारामतीतही गेल्या काही दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यात एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. डहाणू तलासरी तालुक्यात डेंग्यूचे 9 संशयित रुग्ण आढळुन आले आहेत.

दरम्यान, मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर आता पालिकेने केईएमवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 4-5 दिवसात हॉस्पिटलच्या सफाईचं काम पूर्ण झालं नाही तर कारवाई करू, असं स्वत: महापौर स्नेहल आंबेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पालिकेने आतापर्यंत 13 हजार 247 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी 344 जणांनी घराची सफाई न केल्याने पालिकेने त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केलीये. मुंबईत 300 जण डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. आत्तापर्यंत मुंबईत 7 जणांचा  डेंग्यूनं मृत्यू झाला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...