डॉक्टरांना डेंग्यूचा डंख !

डॉक्टरांना डेंग्यूचा डंख !

  • Share this:

dengu_nagpur05 नोव्हेंबर : राज्यभरात डेंग्यूनं थैमान घातलं असून मुंबई पाठोपाठ नागपुरातही डोकंवर काढलंय. नागपूरमधील शासकीय मेडिकल कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झालीये. या सर्वांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

कॉलेजच्या वसतिगृहात कमालीच्या अस्वच्छता आहे. त्यामुळेचे डेंग्यूचा फैलाव झाला असल्याची शक्यता आहे.

तर मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये 4 डॉक्टरांना डेंग्यूची लागण झालीय. डॉ. शशी यादव, डॉ अरविंद सिंग, डॉ.धीरज यांना डेंग्यूची लागण झाली आहे. तसंच, डॉ. वृज दुर्वे यांनाही डेंग्यूनी ग्रासलंय. 10 दिवसांपूर्वी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झाला होता.

दरम्यान, डेंग्यूला पोलिओ आणि टी बीप्रमाणे नोटीफाएबल आजार म्हणून घोषित करा, अशी मागणी मुंबई पालिकेनं केलीय. राज्य सरकारकडे तसं पत्र पालिकेनं पाठवलंय. 4 डॉक्टरांना डेंग्यू झाल्यावर आता महापालिकेला जाग आलीय आणि केईमच्या परिसरात साफसफाई सुरू केलीय

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2014 02:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading