पांढरं सोनं रडवणार !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2014 10:45 PM IST

Image acs_on_cotton_300x255.jpg03 नोव्हेंबर : खान्देशातला कापूस उत्पादक शेतकर्‍यावर संकट कोसळलंय. परतीचा पाऊस न आल्याने आणि कापसाला मिळणार्‍या तुटपुंज्य दरामुळे इथला शेतकरी अडचणीत आलाय. सत्तेच्या सारीपाटात रंगलेल्या राजकीय पक्षांना मात्र कापूस उत्पादकांची व्यथा दिसेनाशी झालीये.

खान्देशातील धुळे , जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात कापूस हे मूळ पिक आहे. कापूस नगदी पिक असल्याने या तिन्ही जिल्ह्यात कापसाचा पेरा सर्वाधिक असतो . मात्र निसर्गाची अवकृपा आणि सरकारची मनमानी धोरणामुळे खान्देशातला कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी खरीपात अतिवृष्टीने मारलं नंतर झालेल्या गारपिटीने रब्बीचा घास हिसकावला. या वर्षी उशिरा आलेल्या पाऊसामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या त्यातच परतीचा पाऊस झालाच नसल्याने कापसाची वाढ खुटली. कमी वाढलेल्या कापसाचे उत्पादन नाहीच्या बरोबरीत होणार आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या व्यथेत शेतकरी सापडला आहे.

एकट्या धुळे जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड आहे. कमी पाऊसामुळे उत्पादकता कमी झाली असून बाजार भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादकाचा कणा मोडायची वेळ आली आहे. गेल्यावर्षी कापसाला या काळात पाच हजार रुपयाच्या घरात भाव मिळत होता. यावर्षी कापसला प्रती क्विंटल चार हजार रुपयांचा भाव मिळत आहे .

उत्पादन खर्च वाढलेले त्यात निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य भाव देण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे अशी अपेक्षा शेतकर्‍यांची आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2014 10:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close