सेना नेत्यांना लागले मंत्रिपदाचे वेध !

सेना नेत्यांना लागले मंत्रिपदाचे वेध !

  • Share this:

uddhav_sena_ledar3203 नोव्हेंबर : 'आम्हाला सत्तेत सहभागी होण्याची घाई नाही' असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं असलं तरी सेनेच्या नेत्यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहे. सेनेनं लवकरात लवकर सत्तेत सहभागी व्हावं अशी इच्छा सेनेच्या एका गटाने व्यक्त केलीये. एवढंच नाहीतर मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू झालंय.

भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं असलं तरी बहुमताची परीक्षा आणखी बाकी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. एवढंच नाहीतर 10 जणांचं मंत्रिगटही स्थापन झालंय. काल रविवारीच खातेवाटपही करण्यात आलंय. पण शिवसेनेनं अजूनही सत्तेत सहभाग न घेतल्यामुळे सेनेच्या वाट्याला कोणती खाती येणार याची चर्चा सुरू आहे. खातेवाटपाबाबत दिल्लीत चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पण आम्हाला सत्तेची घाई नाही चर्चा सुरू आहे, असं काल उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितलं. पण, शिवसेनेतल्या एका गटाला लवकर सत्तेत सहभागी व्हावं असं वाटतंय. चर्चा सकारात्मक होत असल्यानं शिवसेनेत मंत्रिपदासाठी नेत्यांनी जुळवाजुळव सुरू केल्याचीही जोरदार चर्चा आहे. शिवसेनेनं 10 जणांची संभाव्य यादी तयार केलीये. सेनेचे आमदार एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, विजय शिवतरे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गुलाबराव पाटील, संजय राठोड, सुभाष देसाई, नीलम गोर्‍हेंचीही वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय. त्यामुळे सेना सत्तेत कधी सहभागी होते उद्धव कधी निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

First published: November 3, 2014, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading