उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही ?

  • Share this:

Devendra_Fadnavis_swearing_in_ceremony_Wankhede_stadium_Mumbai (46)31 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावल्यानं आता शिवसेना सत्तेत सहभागी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास सेनेतून 8 जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर उमुख्यमंत्रिपदासाठी अनिल देसाईंचं नाव आघाडीवर आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथविधीला येणार की नाहीत, याची उत्सुकता होती. पण, अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. आज दुपारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली तसंच खुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि शपथविधीचं निमंत्रण दिलं. त्यानंतर उद्धवनी शपथविधीला हजर न राहण्याचा निर्णय बदलला. पण, युतीबद्दल आताच काही बोलणार नाही, असं त्यांनी कार्यक्रमानंतर सांगितलं. भाजपच्या नेत्यांनी आता सर्व निर्णय शिवसेनेवर सोपवला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे. सेना जर सरकारमध्ये सहभाग घेतला तर सेनेचे आमदार एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, विजय शिवतरे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गुलाबराव पाटील, संजय राठोड, सुभाष देसाई, नीलम गोर्‍हेंचीही वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय, पण शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. जर भाजपने उपमुख्यमंत्रिपद दिले तर उमुख्यमंत्रिपदासाठी अनिल देसाईंचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 जणांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट आणि 2 राज्य मंत्रिपद आहेत. त्यामुळे मुख्य खाती भाजप आपल्याकडे राखणार हे स्पष्ट झालंय. त्यामुळे शिवसेनेनं सरकारमध्ये सहभागाबद्दल उपमुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2014 11:47 PM IST

ताज्या बातम्या