कॅग अहवाल : विकासनिधीच्या बाबतीत खासदार उदासीन

12 जून खासदारांच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्राला केंद्राकडून 204 कोटी 83 लाख रुपयांचा कमी विकासनिधी मिळाला असल्याची माहिती 2007 -2008 च्या कॅगच्या अहवालात उघड झाली आहे. 2007-2008 चा कॅग अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. त्या अहवालात राज्यसभेवर तीन वर्षं खासदार राहिलेल्या लता मंगेशकर आणि वर्षभर खासदार राहिलेले प्रीतिश नंदी या दोघांनी त्यांना मिळालेल्या खासदार निधीतला 1 रुपयादेखील विकासकामांसाठी खर्च केलेला नाही, अशी माहिती कॅगच्या अहवालात दिली आहे. तसंच सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेतल्या त्यांच्या तीन वर्षांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत विकासकामांसाठी फक्त 1 कोटी रुपये खर्च केले, तसंच विलास मुत्तेमवार यांनी पाच वर्षांत 1 कोटी रुपये तर प्रफुल्ल पटेल यांनी पाच वर्षांत 3 कोटी 37 लाख रुपयांची विकासकामं केली असल्याचं 2007-2008 चा कॅग अहवाल सांगतो.

  • Share this:

First published: June 12, 2009, 9:26 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading