अशी आहे टीम देवेंद्र

अशी आहे टीम देवेंद्र

  • Share this:

teamdevendra_fadanvis31 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) महाराष्ट्राचे सत्ताविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा भव्य महाशपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्यासह फडणवीस यांची 'टॉप टेन' टीमनेही शपथ घेतली. भाजपचे नेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा,प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीम कशी आहे त्याची ही तपशील...

 

अशी आहे टीम देवेंद्र

एकनाथ खडसे

- उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ नेते

- सलग पाचव्यांदा आमदार

- युती सरकारच्या काळात अर्थमंत्री, जलसंपदा

- विरोधी पक्षनेते म्हणून ठसा

- प्रशासनाचा उत्तम अनुभव

- कोअर कमिटीचे सदस्य

- खान्देशात भाजपला मोठं यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा

सुधीर मुनगंटीवार

- भाजप माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी

- 1984 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली

- सलग पाचव्यांदा विधानसभेवर

- युती सरकारच्या काळात पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्री

- सार्वजनिक हिताची सर्वाधिक अशासकीय विधेयकं विधानसभेत मांडली

- उत्कृष्ट वक्ता पुरस्काराचा मान

- चंद्रपूर-गडचिरोलीत भाजपचा गड राखला

विनोद तावडे

- विद्यार्थीदशेपासून राजकारणात

- अभाविपपासून राजकारणाला सुरुवात

- विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद

- कोअर कमिटी सदस्य

- भाजप राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारीही भूषवली

- कोअर कमिटी सदस्य

पंकजा मुंडे

- कोअर कमिटी सदस्य

- भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष

- गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारसदार

- विधानसभा निवडणुकीत प्रचाराची मोठी जबाबदारी

- सिंदखेडराजा ते चौंडी यशस्वी संघर्षयात्रा

- पुण्यात युथ फोरमच्या माध्यमातून अनेक काम

विष्णू सावरा

- विक्रमगडचे आमदार

- सलग सहाव्यांदा आमदार

 - ठाणे ग्रामीण आणि पालघरमध्ये भाजप रुजवली

- भाजपचा आदिवासी चेहरा

- युती सरकारच्या काळात आदिवासी विकास राज्यमंत्री

- आदिवासी राज्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी

- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय काम

- जिल्हा परिषद सदस्य ते युती सरकारचे मंत्री अशी कामगिरी

 चंद्रकांत पाटील

- कोल्हापूरमधल्या गडहिंग्लजचा जन्म

- वडील गिरणी कामगार

- बी.कॉम.चे शिक्षण मुंबईत

- अभाविपच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह

- प्रमोद महाजनांच्या आग्रहाखातर भाजपप्रवेश

- पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार

- सलग दुसर्‍यांदा आमदार

प्रकाश मेहता

- मूळचे गुजरातचे, पण अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक

- रा.स्व.संघाचे स्वयंसेवक

- भाजयुमोपासून राजकारणाची सुरुवात

- जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांचा प्रभाव

- भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष

- 1990 साली घाटकोपरमधून भाजपचे पहिल्यांदा आमदार

- गेल्या सलग 25 वर्षांपासून घाटकोपरचे आमदार

- सलग सहाव्यांदा आमदार

- युतीच्या काळात राज्यमंत्रिपद, कॅबिनेटचे गृहनिर्माण मंत्रीपद

 विद्या ठाकूर

- 1992 साली भाजपच्या नगरसेविका म्हणून राजकारणाला सुरुवात

- शिक्षण - 8 वी उत्तीर्ण

- पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आमदार

- गोरेगावमधून सुभाष देसाईंविरोधात विजय

- मुंबईच्या पहिल्या महिला उपमहापौर

- शुभा राऊळ यांच्यासोबत उपमहापौर

- मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माजीच्या चेअरमन

- जनसंघाच्या काळापासून राजकारणाचा वारसा

-दिलीप कांबळे (पुणे)

- युती सरकारमध्ये समाजकल्याण राज्यमंत्री

- माजी मंत्री रमेश बागवे यांचा केला पराभव

- राजकीय वारसा नाही

- भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष

- प्रदेश चिटणीस

- पुणे शहर युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष

Follow @ibnlokmattv

First published: October 31, 2014, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading