'मातोश्री'वर आज काय ठरणार ?

'मातोश्री'वर आज काय ठरणार ?

  • Share this:

uddhav_matoshree29 ऑक्टोबर : भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेनं आज संध्याकाळी 'मातोश्री'वर सर्व शिलेदारांची बैठक बोलावली आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देऊन सेनेची कोंडी केली आणि दुसरीकडे भाजप सेनेला सोबत घेण्याची चर्चा करत आहे पण निर्णय अजून वेटिंगवर ठेवला आहे. त्यामुळे या बैठकीला महत्वप्राप्त झालंय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व बड्या नेत्यांना बैठकीसाठी बोलवलंय. संजय राऊत, निलम गोर्‍हे आणि एकनाथ शिंदे या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलीय. त्यापूर्वी शिवसेनेचे काही नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. संध्याकाळी होणार्‍या बैठकीत पुढच्या रणनीतीबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. मंगळवारी शिवसेना नेत्यांची एक बैठक झाली. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप काय निर्णय देते याकडे आता शिवसेनेचं लक्ष असेल. अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे देण्यात आले आहेत. दरम्यान, त्यापूर्वी शिवसेनेला सोबत घेऊन जाण्याची भाजपची इच्छा आहे. चर्चा सुरू आहे पण त्यात काही काळ जाईल असं भाजपचे नेते जे पी नड्डा यांनी कालच स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेनं मवाळ भूमिका घेतल्यानंतरही भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली. एवढेच नाहीतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला. राष्ट्रवादीनेही बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झालीये. सेनेच्या गोटातून नरमाईची भूमिका घेण्यापेक्षा विरोधी बाकावर बसू असा सूर उमटत आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेत हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: October 29, 2014, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading