ज्युनिअर कॉलेजच्या फी वाढीवर शुल्क नियंत्रण समितीचं नियंत्रण

9 जून राज्यातल्या कोणत्याही माध्यमिक शाळांनी फी वाढ करताना शुल्क नियंत्रण समितीची परवानगी घ्यावी, असा निर्णय सरकारने विधानसभेत घेतला आहे. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजच्या फी वाढीवर आता शुल्क नियंत्रण समितीचं नियंत्रण असेल अशी लेखी माहिती देण्यात आली. याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती विधानसभेत दिली. तसंच आयसीएसई, सीबीएससी, आयजीसीएसई आणि आयबी या अभ्यासक्रमांच्या शाळांनाही या समितीचे नियम लागू असून त्यांना मनमानीपणे फी वाढ करता येणार नाही, असंही बोलण्यात आलं आहे. या संदर्भात बोलताना नवी मुंबईतल्या डिएव्ही शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांनी केलेल्या आंदालनामुळे या शाळेने केलेली फी वाढ रद्द करण्यात आली आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. मात्र काल पत्रकार परिषदेत ज्युनियर कॉलेजच्या फी वाढीवर सरकारचं नियंत्रण नसेल असं म्हणणार्‍या शिक्षणमंत्र्यांनी मात्र आज कोलांटउडी मारत ही चूक सुधारली.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2009 03:30 PM IST

ताज्या बातम्या