अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीतून पळाला

  • Share this:

dawood_ibrahim27 ऑक्टोबर : भारत आणि अमेरिकेनं एकत्र येऊन फास आवळल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कराचीतून धूम ठोकली आहे.

भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईच्या भीतीनं तो पळाल्याचं समजतंय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयनेच दाऊदला पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर पाठवल्याचीही माहिती मिळतेय.

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि अनेक प्रकरणातील मोस्ट वॉन्डेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताच्या ताब्यात कधी येणार याची चर्चा बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. तत्कालिन यूपीए सरकार असताना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दाऊदला पकडून आणणार अशी गर्जना केली होती मात्र ती हवेतच गायब झाली. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौर्‍यावर जाऊन आले. दोन्ही देशांनी दहशतवादाच्या विरोधात संयुक्त कारवाई करण्याचा करार केलाय. त्यानंतर आज पहिला झटका बसला तो दाऊद इब्राहिमला. भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाई करण्याची चाहूल लागताच दाऊदने पळ काढला. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने दाऊदला दुसर्‍या ठिकाणी हलवलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला कराचीतील क्लिफ्टन भागातून पाक-अफगानच्या सीमारेषेवर पाठवले असल्याची माहिती आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 06:02 PM IST

ताज्या बातम्या