शिवसेना नरमली, मुख्यमंत्रिपदासाठी दिला पाठिंबा !

  • Share this:

uddhav on narendra modi sabha27 ऑक्टोबर : राज्यात भाजपनं कोणाचीही मुख्यमंत्रिपदी निवड केली तरी शिवसेनेची त्याला साथ असेल असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतर प्रचारादरम्यान भाजपला लक्ष्य केलेल्या शिवसेनेने आज (सोमवारी) भाजपसंदर्भातील आपली भूमिका अधिक मवाळ केल्याचे चित्र दिसू लागले आहेत.

अनुभव व आवाका पाहता गडकरी हे उजवे असले तर दुसरीकडे फडणवीस यांना राज्याच्या कारभाराचा अनुभव नाही. या संदर्भातील अंतिम निर्णय हा भाजपच्या दिल्लीमधील उच्चस्तरीय नेतृत्वातर्फेच घेतला जाईल. यामुळे या संदर्भात राज्यामधील नेत्यांनी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.  उद्या (मंगळवार) मुंबईमध्ये भाजपचे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह आणि जे. पी. नड्डा हे बैठक घेऊन मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित करणार आहेत. या पाश्‍र्वभूमीवर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, जनतेची इच्छा असेल तर सेना-भाजप एकत्र येतील, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. जर नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकते तर भाजप आणि शिवसेनेत का नाही? भाजप आणि शिवसेना तर 25 वर्षांपासून एकत्र आहेत त्यामुळे मनं जुळू शकतात असंही ते म्हणाले आहेत. भाजपचा राज्यातला विजय हा मोदी आणि अमित शहांमुळे शक्य झाल्याचंही यात म्हटलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय भाजपचे दिल्लीतील हायकमांडच घेणार असल्याने राज्यातील नेत्यांनी डोकेफोडी करून तरी काय उपयोग? राज्यात भाजपच्या जागा वाढल्या व ते बहुमताच्या जवळ पोहोचले ते केवळ मोदी-शहा यांच्यामुळेच. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घोटाळेबाजांना सत्ता मिळण्यापेक्षा भाजपला ती मिळतेय यातच राज्याचे हित आहे. राज्यात गडकरी, फडणवीस, जावडेकर, तावडे, खडसे, पंकजा मुंडे की आणखी कोणी, हे दिल्लीवालेच ठरवतील. अनुभवी गडकरींकडे विकासाचे व्हिजन आहे तर प्रत्यक्ष मंत्रिपदाचा अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे विधिमंडळातला दांडगा अनुभव आहे. जनतेच्या आशीर्वादाचे सोने करून महाराष्ट्राचा रथ पुढे नेणारा कोणीही असू द्या, शिवसेना हिमतीने आणि हिकमतीने त्यास साथ देईल.

Follow @ibnlokmattv

First published: October 27, 2014, 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading