युती व्हावी पण सेनेच्या जास्तीच्या अटी नसाव्यात -तावडे

युती व्हावी पण सेनेच्या जास्तीच्या अटी नसाव्यात -तावडे

  • Share this:

tawade_427 ऑक्टोबर : शिवसेना आणि आमची युती 25 वर्षांची होती मात्र जागावाटपाच्या मुद्यावरुन युती तुटली आता झालं ते झालं. शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार बनवण्यास भाजप उत्सुक आहे, पण जास्त अटी नसाव्यात असं स्पष्ट मत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलंय.

राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. भाजपच्या नेत्यांनी येत्या दोन दिवसांत सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय.भाजपमध्ये एकीकडे मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते आपल्या मोठ्या भावाला सोबत घेण्यासाठी उत्सुक आहे. शिवसेना आणि आमची युती जुनी होती. जागावाटपावरुन वाद झाला. त्यामुळे युती तुटली आता जे झालं ते झालं. शिवसेनासारखा पक्ष सोबत आला पाहिजे. पण त्यांनी हेच मंत्रिपद मिळावं तेच मंत्रिपद मिळावं अशी कोणतीही अट घालू नये. मुळात अटी लादणं वेगळं आणि अटीची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे हे जर आताच असेल तर सरकार चालवण्यास अडचणी येतील असं मत विनोद तावडेंनी व्यक्त केलं. त्याचबरोबर घटकपक्षांना आश्‍वासन दिल्याप्रमाणे सत्तेत वाटा दिला जाईल, असंही तावडेंनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

First published: October 26, 2014, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading