नांदेड-मनमाड पॅसेंजरला आग, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

नांदेड-मनमाड पॅसेंजरला आग, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

  • Share this:

  • Burning train aurangabad26 ऑक्टोबर :  नांदेड- मनमाड धावत्या पॅसेंजर ट्रेनला औरंगाबाद - दौलताबाद रेल्वेस्थानकांदरम्यान आग लागली. अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली. अग्निशामक दलाची मदत तातडीने पोचल्याने आग विझवण्यात यश आले, यात एक डबा जळून खाक झाला.नांदेड-मनमाड पॅसेंजर रविवारी पहाटे दीडच्या सुमारास औरंगाबाद स्टेशनवर पाच मिनिटं थांबून ती मनमाडच्या दिशेने रवाना झाली, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत ही दुर्घटना घडली. ट्रेनने वेग घेतलेला असतानाच दोन डब्यांच्या जोडामधून म्हणजेचं, शौचालयाच्या बाजूनं आगीला सुरवात झाली. ही गोष्ट काही प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर लगेचच प्रवाशांनी साखळी ओढली, त्यानंतर जवळपास एक किलोमीटर अंतरावर  ट्रेन थांबली. आग लागल्याचे समजल्यानंतर प्रवाशांत खळबळ उडाली, प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाला, ट्रेनचा वेग कमी होताच अनेक प्रवाशांनी गाडीतून खाली उड्या मारल्या.

    गाडी थांबल्यानंतर मध्यरात्रीचा अंधार आणि ट्रेन रुळाच्या दोन्ही बाजूने झाडी, यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. घटनास्थळ औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून जवळच असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर घटनास्थळी पोचून तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर प्रवाशांना सुरक्षितरीत्या दौलताबाद स्थानकावर हलवण्यात आलं. या दुर्घटनेचं कारण अजून समजू शकलेलं नसून, पुढील तपास सुरू आहे.

    द बर्निंग ट्रेन

  • 3 जानेवारी 2014

मुंबई-ठाणे लोकलला आग

ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये आग

आगीत कोणीही जखमी नाही

  • 8 जानेवारी 2014

मुंबई-डेहराडून एक्स्प्रेसला डहाणूजवळ आग

9 प्रवासी आगीत भस्मसात

  • 23 ऑक्टोबर 2014

सोलापूर रेल्वे स्थानकात दोन बोगींना आग

जीवितहानी नाही

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2014 11:54 AM IST

ताज्या बातम्या