झालं, गेलं विसरून जा,आठवलेंचा ठाकरेंना सल्ला

झालं, गेलं विसरून जा,आठवलेंचा ठाकरेंना सल्ला

  • Share this:

SENA-BJP_MANIFESTO_1735540f

24 ऑक्टोबर : उद्धव ठाकरेंना झालं-गेलं विसरून जाण्याचा सल्ला देत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला सोबत घेण्यावाचून भाजपकडे पर्याय नसल्याने भाजपला शिवसेनेचा पाठिंबा घ्यावाच लागेल, असं मत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत झालं, गेलं विसरून जा असा सल्लाही उद्धव ठाकरेंना दिल्याचं आठवलेंनी सांगितलं. भाजपसोबत युती करण्यास कुठलीही अडचण नसल्याचं उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती आठवलेंनी पत्रकरांशी बोलताना दिली. युतीबाबत सविस्तर चर्चा दिवाळीनंतर करण्यात येणार असून त्यानंतर लगेच नवीन सरकार स्थापन करण्यात येईल, असंही आठवले यावेळी म्हणाले.

Follow @ibnlokmattv

First published: October 24, 2014, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading