धनंजय मुडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

धनंजय मुडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

  • Share this:

dhanjay munde22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे पाठवलाय.

बीडमधल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय. 2013 ला राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची आमदारकी मिळाली होती . ांदाच्या विधानसभेत पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देत असल्याची माहीती धनंजय मुंडे यांनी दिलीय. धनंजय मुंडे बीडमध्ये परळीत भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र दहा हजार मतांच्या फरकाने धनंजय मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. अखेर आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारेल की नाही, याबाबत शंका आहे.

Follow @ibnlokmattv

First published: October 22, 2014, 9:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading