गडकरींच्या मुख्यमंत्रिपदासाठी कृष्णा खोपडे आपली आमदारकी सोडायला तयार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2014 02:45 PM IST

Nitin-Gadkari-new

22  ऑक्टोबर : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या मागणीने आता जोर धरलाय आणि त्यासाठी भरपूर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.  नितीन गडकरी जर मुख्यमंत्री होणार असतील, तर त्यांच्यासाठी विधानसभेच्या आमदारकीची जागा सोडण्याची तयारी भााजपचे पूर्व नागपूर इथले विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांनी दाखवली आहे.

काल गडकरींचं नागपुरात जंगी स्वागत केल्यानंतर आता त्यांच्यासाठी जागा सोडण्याची तयारी आमदार दाखवत आहेत. गडकरींनी वारंवार दिल्लीतच राहण्याची मनीषा व्यक्त केली आहे. मला महाराष्ट्रात यायचं नाही मात्र पक्षाचा अंतिम निर्णय मान्य असेल असं गडकरींनी काल स्पष्ट केलं. गडकरींनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी राज्यातील, भाजप नेत्यांची इच्छा असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं

गडकरींच्या घराबाहेर 40 आमदारांनी काल जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. कृष्णा खोपडे नागपूरचे भाजप शहराध्यक्षही आहेत, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवरून आता चर्चा सुरू झाली आहे. गडकरी मुख्यमंत्री होणार असतील, तर त्यांच्यासाठी आपण जागा सोडू शकतो, असं खोपडे म्हणाले आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...