S M L

मुंबईतल्या अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याचं प्लॅनिंग करणार्‍या अनीसला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Oct 21, 2014 02:33 PM IST

मुंबईतल्या अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याचं प्लॅनिंग करणार्‍या अनीसला अटक

21 ऑक्टोबर : मुंबईतल्या अमेरिकन शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याबाबत फेसबुकवर चॅटिंग करणार्‍या, एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबईत एटीएसने अटक केली आहे. अनिस अन्सारी असं त्याचं नाव असून तो कुर्ल्यातील रहिवासी आहे. अनीसने फेसबूकवर चॅटिंगसाठी एक बोगस अकाऊंट बनवलं होतं. अमेरिकेने सिरियात केलेले बॉम्बहल्ले आणि ISIS संघटनेविरोधात सुरू केलेल्या मोहिमेबद्दल तो चॅटिंग करत होता. फेसबुकवरील चॅटिंगमध्ये त्याने आपण बीकेसी येथील अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडविणार असल्याचं म्हटलं होतं. याच आधारे त्याला दहशतवादविरोधी पथकानं अटक केली. अनिस हा अंधेरीतल्या सिप्झमध्ये एका कंपनीमध्ये कंम्प्युटर म्हणून काम करतो. याशिवाय त्याने इराकला जाण्यासाठी एक महिन्यापूर्वी पासपोर्टसाठी अर्जही केला होता. दरम्यान, ISISचा समर्थक असलेल्या अन्सारीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2014 10:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close