S M L

टीक टीक वाजते डोक्यात...धडधड वाढते ठोक्यात....

Sachin Salve | Updated On: Oct 18, 2014 06:26 PM IST

टीक टीक वाजते डोक्यात...धडधड वाढते ठोक्यात....

18 ऑक्टोबर : प्रचार आणि मतदानाच्या धामधुमीनंतर आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते निकालांचे. आता काही तासांत निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे आपला निकाल काय लागणार याची धाकधूक आता वाढलीये. राज्यात एकूण 288 जागांसाठी 4 हजार 111 उमेदवारांचं भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या ठोक्याची धडधड आता आणखी वाढत जाणार आहे हे स्पष्ट आहे.

यंदाची निवडणूक ही ऐतिहासिक ठरली आहे. कारण सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहे. त्यामुळे पंचरंगी लढती पाहण्यास मिळाल्यात. आता निकालाची वेळ येऊन ठेपली आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी सगळ्या मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतोय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी पाच उमेदवार असल्याने तिथले निकाल सर्वात आधी लागण्याची अपेक्षा आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक 39 उमेदवार असल्याने तिथले निकाल उशिरानं लागण्याची शक्यता आहे. पहिल्या तासाभरात निकालांचे कल येतील आणि दुपारपर्यंत बहुतांश निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. मालेगाव हा सर्वात छोटा मतदारसंघ असून तिथे केवळ 218 तर मुंबईतील वडाळा मतदारसंघात 222 मतदान केंद्र असल्याने हे निकालही लवकर लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी आपापले काऊंटिंग एजंट नेमण्याचं काम केलंय. प्रत्येक मतमोजणीच्यावेळी हे काऊंटिंग एजंट हजर असणार आहेत. तर ठाण्यातील 4 मतदारसंघांसाठी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे या मतदारसंघांमध्ये मात्तबर उमेदवार निवडणूक लढवत असून दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. ठाणे शहर मतदारसंघाची मतमोजणी भाजी मंडई मानपाडा तसंच ओवळा माजिवडा मतदारसंघांची मतमोजणी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे. तर कोपरी पाचपाखाडी मतदार संघाची मतमोजणी आयटीआय वागळे इस्टेट तर कळवा मुंब्रा मतदार संघाची मतमोजणी सहकार विद्यालय येथे होणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2014 06:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close