कुर्ल्यात दुकानात सिलेंडर स्फोट, 1 गंभीर जखमी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2014 11:41 PM IST

कुर्ल्यात दुकानात सिलेंडर स्फोट, 1 गंभीर जखमी

kurla_blast16 ऑक्टोबर : मुंबईतील कुर्ला भागात एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जन जखमी झाले आहेत. त्यातील एक जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

फायर ब्रिगेड आणि कुर्ला पोलीस घटनास्थाळावर हाजर झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कुर्ल्याच्या एल.बी.एस. मार्गावरील कुर्ला गार्डनजवळ स्पेअर पार्टस् तसंच वाहने दुरुस्त करण्याचे दुकान आहेत.

त्यातील एक दुकानात दुपारी सिलेंडर स्फोट झाला त्यात 2 जण जखमी झाले. सुदैवाने बाजुच्या दुकांनात या स्फोताची झळ लागली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2014 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...