मतदारराजा रूसला, मतदानाकडे फिरवली पाठ !

मतदारराजा रूसला, मतदानाकडे फिरवली पाठ !

  • Share this:

no vote osmanbad15 ऑक्टोबर : राज्यभरात एकीकडे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे लोकांनी मतदान करावं यासाठी आग्रह धरला जात आहे पण दुसरीकडे सोयीसुविधा मिळत नाही म्हणून नाराज मतदारांनी बहिष्काराचे शस्त्र उपसले आहे. राज्यात ठिकठिकाणी नाराज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. अहमदनगर जिल्हातल्या लोणी मसदपूरच्या गावकर्‍यांचा मतदानावर बहिष्कार टाकलाय. गावातल्या रस्त्यांसह इतर मागण्यांसाठी गावकर्‍यांनी पाठपुरावा केला होता. मात्र त्याला अपयश आल्यानं त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. लोणी मसदपुरची लोकसंख्या 2000 असून गावात 1200 मतदार आहेत. तर पालघरच्या वाडा मतदारसंघात 40-50 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आदिवासींना नोकरीत 100 टक्के आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ बिगर आदिवासींनी 100 टक्के बहिष्कार टाकला आहे. मतदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे मतदान केंद्र ओस पडली आहे.

भंडार्‍यात पेंच प्रकल्पामुळे बहिष्कार

तर भंडारा जिल्ह्यातल्या मोहगावदेवी गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. तुमसर मतदार संघात येत असलेल्या या गावातल्या लोकांनी पेंच प्रकल्पाचं पाणी शेतीला मिळत नसल्याचा निषेध म्हणून मतदानावर बहिष्कार घातला आहे.पेंच प्रकल्पाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे शेतकर्‍यांना वर्षानुवर्ष दुष्काळाचा सामना करावा लागतो. याविरोधात गावकर्‍यांनी मंगळवारी बहिष्कार रॅली काढली आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय.

ग्रामपंचायतीसाठी बहिष्कार

उस्मानाबादमध्येही रघुचीवाडी गावच्या गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची या गावकर्‍यांची मागणी आहे. 900 मतदार असलेल्या या गावाचा उस्मानाबाद शहरात समावेश होतो. पण, आपली स्वतंत्र ग्रामपंचायत करावी, अशी या गावकर्‍यांची फार जुनी मागणी आहे. पण, त्याची सरकारदरबारी सुनावणी होत नसल्याने अखरे गावकर्‍यांनी मतदानावरच बहिष्कार टाकलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2014 03:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading