निवडणूक अधिकार्‍याच्या घरी सापडल्या 4 ईव्हीएम मशिन्स

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2014 12:20 PM IST

निवडणूक अधिकार्‍याच्या घरी सापडल्या 4 ईव्हीएम मशिन्स

vasai evm15 ऑक्टोबर : मतदान प्रक्रिय शांतपणे पार पाडण्यासाठी 25 हजार निवडणूक कर्मचारी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहे. मंगळवारी सर्व यंत्रणा सज्ज झाली. मात्र वसईत एका निवडणूक अधिकार्‍यांच्या घरी ईव्हीएम मशीन सापडल्याची धक्कादायक बाब उघड झालीये. निवडणूक अधिकारी अशोक मांदरे यांच्या घरी 4 मशीन आढळल्या आहेत.रात्रीच्या अंधारात स्थानिक पोलीस सरंक्षणात या मशीन अधिकारी व त्यांच्या पत्नी रात्री घराबाहेर काढून नेत होते. विद्यमान आमदार विवेक पंडित यांनी हे प्रकरण उघड करून, मुक्त व योग्य पद्धतीने निवडणुका होण्याची मागणी केली आहे.

रात्रीचे दोन वाजले आहेत..विधानसभाचे क्षेत्रिय अधिकारी अशोक मांदरे आणि त्यांच्या पत्नी हे चार ईव्हीएम मशीन घेऊन चाललेत. शासकीय कार्यालयात...ते ही स्थानिक पोलिसांच्या संरक्षणात..ही कुठल्या बिहारची स्थिती नसून, मुंबईजवळ असलेल्या वसई विधानसभा क्षेत्रातील ही घटना आहे. वसई विधानसभाचे क्षेत्रिय अधिकारी अशोक मांदरे यांनी निवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन ह्या वसईच्या गोलानी परिसरातील दिप टॉवर या आपल्या राहत्या घरात ठेवल्या. आणि रात्रीच्या अंधारात दोन वाजता हे आपल्या पत्नीसह शासकीय कार्यालयात घेवून जायाला निघाले. ते ही स्थानिक पोलीस संरक्षणात. त्याचवेळी तेथे वसईचे विद्यमान आमदार विवेक पंडित हे येऊन थडकले. आणि ई.व्ही.एम. मशीन गेटजवळ थांबवून, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना फोनवरून घटनास्थळी बोलावून घेतलं. मात्र तब्बल दोन तासांनी वसईचे तहसीलदार आले. विवेक पंडित यांनी येथील निवडणूक यंत्रणा आणि पोलीस हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

घटनास्थळी वसईचे तहसीलदार येऊन त्यांनी ही निवडणुकीच्या वोटिंग मशीन घरात ठेवू शकत नसल्याचं मान्य केलं आहे. सदर मशीन या क्षेत्रिय अधिकार्‍यांना अतिरिक्त आणि रिझर्व्ह मशीन दिल्या असतात. जेव्हा काही मशिनमध्ये तांत्रिक बिघाड होतो त्यावेळी या मशीन बदलीच्या स्वरूपात वापरल्या जातात. तहसिलदारांनी चारही मशिनचा पंचनामा करून, त्या ताब्यात घेतल्या आहेत आणि संबंधीत अधिकार्‍यावर योग्य ती कारवाईचे आश्वासन ही दिलं आहे

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2014 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...