राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

  • Share this:

raj thakre

14 ऑक्टोबर :  प्रचारसभेतील भाषणात अमराठी लोकांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधान आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने काल (सोमवारी) मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाने राज यांना गुरुवारी सकाळपर्यंतची मुदत दिला आहे. या कालावधीत उत्तर न दिल्यास त्यांच्यावर थेट कारवाईच करणार असल्याचाही इशारा आयोगाने दिला आहे.

याआधीही राज ठाकरे यांच्यावर अमराठींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवारून कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. आता निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांनी प्रचारा दरम्यान केलेल्या भाषणांत अमराठीं नागरीकांना केलेल्या वक्तव्यांची दखल गंभीर दखल घेत राज ठाकरेंवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: October 14, 2014, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading