'मला सांगा, काश्मीरला जाण्याची सोय करून देतो', पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

'मला सांगा, काश्मीरला जाण्याची सोय करून देतो', पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीत प्रचारसभा घेतली. यावेळी लोकांची सभेची गर्दी पाहून काँग्रेस राष्ट्रवादीला धडकी भरली असेल असं ते म्हणाले.

  • Share this:

बीड, 17 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीमध्ये सभा घेतली. यावेळी आज एकाच दिवशी दोन देवांचे दर्शन करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं असं मोदी म्हणाले. इथं पोहचताच वैद्यनाथाचं दर्शन घेतलं त्यानंतर या मोठ्या जनता जनार्दनाचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं. जनतासुद्धा देवाचं रूप असते असं मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यशक्ती विरुद्ध विरोधकांच्या स्वार्थ शक्तीचा सामना असल्याचं मोदी म्हणाले

काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर होत असलेल्या विरोधावरून मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. कलम 370 च्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना जनता कधीच विसरणार नाही. आम्ही पक्षाच्या जन्मापासून कलम 370 ला विरोध केला असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. या निर्णयामुळे देश उद्ध्वस्त होईल असं विरोधक म्हणत होते पण खरचं काश्मीर गमावलं का? तुम्हाला काश्मीरला जायचं असेल तर मला सांगा मी सोय करून देतो असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

विरोधक थकल्याचं सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीला धडकी भरली आहे. भाजप कार्यकर्ते निवडणुकीची इतकी तयारी का करत आहेत असा विरोधकांना प्रश्न पडला असेल. विरोधकांमधले तरुण आणि वृद्ध निराश झाले असल्याचं म्हणत मोदींनी हल्लाबोल केला.

गेल्या पाच वर्षांची कार्यशक्ती आमच्या मागे आहे. आमच्याकडे कार्यशक्ती तर कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे स्वार्थशक्ती आहे. 370 चा विरोध आमच्या पक्षाचा जन्म झाला तेव्हापासून करत आहोत. विरोधकांचे कट जनतेनं पाहिले आहेत लोकच विरोधकांना शिक्षा देतील असं मोदी म्हणाले.

राज्याला दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. केंद्र सरकारचं जल जीवन मिशन असून 2022 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा संकल्प आहे. मराठवाड्यात पाणीप्रश्न ही गेल्या अनेक वर्षांची समस्या असून ती सोडवणार असल्याचं आश्वासनही मोदींनी दिले.

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

First published: October 17, 2019, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading