आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर - मोदी

  • Share this:

narendra_modi_hariyana

13 ऑक्टोबर :  पालघर हा एक नवीन जिल्हा आहे. या भागातल्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधल्या सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे.

पालघर येथील मच्छिमारांचा गुजरातच्या मच्छिमारांबरोबर एक अनोखा संबंध आहे, असे मला वाटते. त्याचं कारण म्हणजे ज्या समस्या या ठिकाणच्या मच्छीमारांसमोर आहेत, तशाच समस्या तेथील मच्छिमारांना पाकिस्ताकडून निर्माण केल्या जात आहेत. दोन्ही ठिकाणच्या मच्छिमारांना तुरुंगात डांबण्याचे काम पाकिस्तानकडून होत आहे. त्यामुळे शपथ घेतल्यानंतर मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर सर्वात आधी हाच मुद्दा उपस्थित केला होता, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानने मच्छिमारांच्या 50 बोट परत केल्या. तसेच 200 हून अधिक मच्छिमारांनाही सोडण्यात आलं असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.

मी 60 दिवसांत काय केले हे विचारणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या 60 वर्षाचा हिशेब कधी दिला आहे का? असा सवाल पुन्हा एकदा मोदींनी उपस्थित केला. पण मी एखाद्या पंतप्रधानाच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या घरात जन्मलेलो नाही. त्यामुळे मी जनतेला हिशोब देण्यास बांधिल आहे, असे मोदींनी सांगितले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2014 01:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading