12 ऑक्टोबर : क्रिकेट वेड्या देशात आयसीएलच्या निमित्ताने फुटबॉलला 'किक' बसली आहे. भारतामध्ये फुटबॉलच्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोलकात्यामधल्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये डोळे दिपून टाकणार्या रंगारंग कार्यक्रमात इंडियन सुपर लीगला शानदार सुरूवात झाली आहे. यावेळी अवघी बॉलीवूड नगरी आणि अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. 'याची देही याचा डोळा' असा हा रंगारंग सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर यजमान ऍटलेटिको कोलकाता आणि मुंबई सिटी FC या दोन संघांदरम्यान पहिल्या मॅचने सुरूवातही झाली.
भारतात येत्या अडीच महिन्यात फुटबॉलचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. आज कोलकात्यात इंडियन सुपर लीगला सुरूवात झाली.
कोलकात्यात भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि वरुन धवन यांचे धम्माकेदार परफॉर्मन्स झाले. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. त्याचसोबत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश
अंबानी, सुपर लीगच्या चेअरपर्सन नीता अंबानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ह्रतिक रोशन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, धोनी आणि सौरभ गांगुलीही उपस्थित होते. 12 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर दरम्यान या आयएसीएलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, बॉलीवूड स्टार्स जॉन अब्राहम, रणबीर कपूर, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासारख्या युथ आयकॉन्सच्या मालकीच्या या टीम्स आहेत. त्यामुळे भारतीयांना येत्या काही दिवसांत फुटबॉलची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.
अशी आहे इंडियन सुपर लीग
या आहेत टीम
आएसएलचे टीम मालक
असे रंगणार सामने
बक्षिसांची लयलूट
आयएसएलमधील परदेशी क्लब
Follow @ibnlokmattv |