सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत काय म्हणाले अमित शहा, वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत काय म्हणाले अमित शहा, वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

भाजप आणि शिवसेना दोघांनीही याआधीपासूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जाते. भाजपनेही त्यांच्या संकल्पपत्रात सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन दिलं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना आता अमित शहा यांनीही यावर नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत त्यांची बाजू मांडली आहे. यासगळ्यावर लक्ष देण्याची गरज असून सावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांइतके देशासाठी बलिदान देणारे फार कमी कुटुंब आहेत असं अमित शहा म्हणाले.

भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं आहे. भाजप आणि शिवसेना दोघांनीही याआधीपासूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार केली होती. त्यावर आता नियमांकडे लक्ष देऊन यावर अभ्यास करणं महत्त्वाचं असल्याचं अमित शहा म्हणाले आहेत. भाजपच्या आश्वासनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका केली होती.

भाजपनं जाहीर केलेल्या संकल्पनाम्यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील 2 ते 3 वर्षांपासून लोकसभेत करत होते. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

इतर बातम्या - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांची प्रतिक्रिया

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमामधून सावरकरांसाठी वीर हा शब्द वगळला होता. तसेच सावरकर यांनी तुरुंगातील त्रासाला कंटाळून ब्रिटीश सरकारकडं माफीनामा सादर केल्याचं पुस्तकात म्हटलं होतं. याशिवाय त्यांचा गांधी हत्येच्या कटात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून बराच वादंग झाला होता. दरम्यान, हिंदू महासभेनं नोटेवर गांधींजींऐवजी सावरकरांचा फोटो छापावा अशी मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय आहे.

इतर बातम्या - EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

नवमहाराष्ट्राचा संकल्प करताना भाजपने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही संकल्पपत्रात म्हटलं आहे. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 620 कोटींची तरतूद करण्यात येईल असंही या संकल्पपत्रात म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरच पूर्ण करू असंही आश्वासनं दिलं आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्र : 73 कोटींच्या पाण्याची चोरी, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

First published: October 17, 2019, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading