प्रचाराचा सुपर संडे!

Samruddha Bhambure | Updated On: Oct 12, 2014 12:52 PM IST

sabha war

12 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा रविवार असल्याने आणि उद्या, सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवसं असल्याने मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा बड्या नेत्यांच्या प्रचारसभांची जोरदार धूम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंढरपूर, तुळजापूर, लोहा (नांदेड), ठाणे आणि बोरीवलीत सभा होत आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दापोली , श्रीवर्धन, अलिबाग, कर्जत आणि वांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स इथे सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही गिरगाव, काळाचौकीतला घोडपदेव नाका आणि लालबाग अशा तीन ठिकाणी सभा होणार आहेत. याशिवाय सर्वच पक्षांतील सर्व स्टार प्रचारकांच्या आज विविध मतदारसंघांत सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात 5 सभा पंढरपूर, तुळजापूर, लोहा (नांदेड), ठाणे आणि बोरिवली
  • राहुल गांधी यांची रामटेकला सकाळी 11 वाजता सभा
  • उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा- दापोली , श्रीवर्धन, अलिबाग, कर्जत आणि संध्याकाळी वांद्रेच्या बीकेसी मैदानात सभा
  • राज ठाकरेंच्या मुंबईत 3 सभा- गिरगाव, काळाचौकीतला घोडपदेव नाका आणि लालबागमध्ये सभा
  • पृथ्वीराज चव्हाण यांची इचलकरंजीत सभा
  • शरद पवारांची दुपारी अडीचला भिवंडीत सभा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2014 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close