मुंबई उपनगरात उद्यापासून 'बेस्ट'चे 52 रूट बंद होणार

  • Share this:

best_bus34मुंबई - 30 एप्रिल : मुंबईची लालपरी असलेली बेस्ट आता काही मार्गांवर धावतांना दिसणार नाही. बेस्टने मुंबईतील 52 बसमार्गांवर रूट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 मेपासून या मार्गांवर बसेस धावणार नाहीये.

मुंबईतील उपनगरात गोरेगाव, वरळी, दिंडोशी आणि इतर काही भागातील बेस्टच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. या रुटवर प्रवाशी मिळत नसून बेस्टच्या फेर्‍या तोट्यात जात असल्यानं हा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही एसी बसेसचाही समावेश आहे.

52 बसमार्गांमध्ये 2 एसी बस, 13 मर्यादित बसमार्ग, 3 जलद कॉरिडॉर बसमार्ग आणि सर्वसाधारण बसमार्गांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी बेस्टच्या या 52 बंद रूट करण्याचा निर्णयाचा विरोध केलाय. हा निर्णय सर्वसामांन्यांसाठी अन्यायकारक असल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 30, 2016, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading