भाजपच्या जाहीरनाम्यात 'वेगळा विदर्भ' वगळला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2014 02:03 AM IST

भाजपच्या जाहीरनाम्यात 'वेगळा विदर्भ' वगळला

bjp manifesto10 ऑक्टोबर : अनेक दिवस रखडलेला भाजपचा जाहीरनामा आज अखेर प्रसिद्ध झाला. मुंबईत भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं. 'समृद्ध महाराष्ट्राची हमी देणार दृष्टीपत्र' असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलंय. अनेक आश्वासनाचा पाऊस तर जाहीरनाम्यात आहेच पण वेगळ्या विदर्भाच्या मुद्याचा यात समावेश करण्यात आलेला नाही. भाजपचे नेते वेगळ्या विदर्भाची आश्वासन देत आहे पण जाहीरनाम्यातून हा मुद्दाच वगळण्यात आलाय.

मतमोजणीला अवघे 5 दिवस शिल्लक असतांना शिवसेनेनं आज आपला वचननामा प्रसिद्ध केला त्यांच्या पाठोपाठ भाजपनेही आपला जाहीरनामा अर्थात दृष्टीपत्र' प्रसिद्ध केलं. वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून टीकेला सामोरं जावं लागत असल्यामुळे जाहीरनाम्यातून मुद्दा वगळणार अशी शक्यता निर्माण झाली होती अखेरीस जाहीरनाम्यात हा मुद्दा आलाच नाही. या व्यतिरिक्त मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसंच महिलांची सुरक्षा, सिंचन घोटाळ्यांसारख्या घोटाळ्यांवर कारवाई, तरूणांसाठी अनेक योजनांचं आश्वासन देण्यात आलंय. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जरी वगळला असला तरी वेगळा विदर्भ ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. याबाबत राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळ्या विदर्भाचा निर्णय घेईन असं भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यात विदर्भाचा मुद्दा नसल्याने केवळ विदर्भातीलच नव्हे तर राज्यातील लोकांसोबत भाजपने बेईमानी केली असल्याची टीका काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. विदर्भाच्या संदर्भात नेहमी उल्लेख करायचा आणि विदर्भ द्यायचा नाही ही लबाडी असल्याचंही मुत्तेमवार म्हणाले.

भाजपच्या जाहीनाम्यातील ठळक मुद्दे

 • वेगळ्या विदर्भाचा उल्लेख नाही
 • Loading...

 • भाजपचं दृष्टीपत्र प्रकाशित
 • लोकसेवा गॅरंटी ऍक्ट महाराष्ट्रात लागू करणार
 • महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा आणणार
 • शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना
 • वाचनसंस्कृती वाढावी यासाठी विशेष प्रयत्न
 • राज्यात 10 स्मार्ट शहरांची स्थापना
 • पोलीस कर्मचर्‍यांची संख्या वाढवणार
 • महिला पोलीसांची भरारी पथकं
 • अन्नदाता आधार पेन्शन योजना
 • कृषी उत्पादन सुरक्षा निधीची निर्मिती करणार
 • नवीन एक्स्प्रेस हायवे करणार
 • नवीन उर्जा धोरण तयार करणार
 •  नवऊर्जा योजना राबवणार
 • समन्यायी पाणी वाटप करणार
 • खोरेनिहाय जलसिंचन योजना राबवणार
 • गुंतवणुकीसाठी 'डेस्टिनेशन महाराष्ट्र' नवी योजना
 •  'मेक इन महाराष्ट्र' प्रकल्प
 •  'माहेरचा आधार' मासिक पेन्शन योजना
 •  महिला सुरक्षा ऑडिट करणार
 • आदिवासींसाठी सौरकंदील देण्याची अंधारमुक्ती योजना
 • पाणी शुद्धिकरणासाठी फिल्टर्स
 • प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करणार
 • मराठी शाळा आर्थिक सबलीकरण योजना राबवणार
 • अरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक
 • डिजिटल मराठी प्रोत्साहन योजना

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2014 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...