पुतण्याने दिली काकांना हाक, सन्मानाने सोबत घेऊ !

पुतण्याने दिली काकांना हाक, सन्मानाने सोबत घेऊ !

  • Share this:

aditya on raj10 ऑक्टोबर : शिवसेना सत्तेत आल्यानंतर जो कुणी पक्ष असेल ज्याला महाराष्ट्रासाठी चांगलं करायचं आहे त्यांना आम्ही चांगली वागणूक देऊन सोबत घेऊ असं सुचक वक्तव्य शिवसेनेचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलंय. एकीकडे काका अर्थात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती होऊ शकली असती असा खुलासा केला आता त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी सोबत येण्याचं एकाप्रकारे निमंत्रणच दिलंय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का ? यावर पुन्हा चर्चा सुरू झालीये. राज ठाकरे यांनी यावेळी स्वत:हुन टाळीसाठी हात पुढे केलाय. युती तुटल्यानंतर दुसर्‍याच दिवशी उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती. मी शिवसेनेसोबत येण्यासाठी तयार होतो पण उद्धव यांनी पुढाकार घेतला नाही असा खळबळजनक खुलासा केला होता. राज यांनी खुलासा केल्यानंतर लगेल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, राज यांची भूमिका महाराष्ट्रहिताची आहे. राज यांच्यासोबत युती करायची की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. आज याच मुद्यावर आदित्य ठाकरे यांच्याशी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींने बातचीत केली असता त्यांनी सेना-मनसे मनोमिलनाचे संकेत दिले आहे. आदित्य ठाकरे आज ठाण्यात प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, सेना-मनसे एकत्र येणार अशी मी तरी चर्चा ऐकली नाही. अशा अफवा खूप आहे. आम्ही एकटे लढत आहोत एकटं जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य मी ऐकेलं नाही. पण आम्ही स्वबळावर लढत आहोत. सत्तेवर आल्यावर जो कुणी महाराष्ट्र घडवायला सोबत येईल त्यांना आम्ही चांगली वागणूक देऊ आणि सोबत घेऊ असं आदित्य म्हणाले. जागावाटपाच्या दरम्यान भाजपच्या नेत्यांनी आदित्य यांच्यासोबत चर्चेवरून लहान मुलगा अशा शब्दात हिणवलं होतं. याला आदित्य यांनी सडेतोड उत्तर दिलं. निवडणुकीच्या अगोदर ही लोकं युथ-युथ करता आणि जेव्हा आम्ही चर्चेसाठी समोर जातो तेव्हा 24 वर्षाचा मुलगा यांना बालिश वाटतो. पण त्यांच्याबदलचा राग जनतेत जानवतो. भाजपचे अध्यक्ष म्हणतात, शिवसेना आमच्यामुळे वाढली. त्यांचं हे विधान अत्यंत हास्यास्पद आहे असा टोला आदित्य यांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2014 04:54 PM IST

ताज्या बातम्या