महाराष्ट्राला नंबर वनवर आणणार, सेनेचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्राला नंबर वनवर आणणार, सेनेचा वचननामा प्रसिद्ध

  • Share this:

shiv sena vachannama10 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार संपायला आता चारच दिवस उरले आहेत तर मतदानाला 6 दिवस राहिले आहेत. अशात आज शिवसेनेनं आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राला देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचं वचन सेनेनं दिलंय. विशेष म्हणजे सेनेनं या वचननाम्याअगोदर आपलं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं होतं. आजच्या वचननाम्यात शिवसेनेनं व्हिजन डॉक्युमेंटमधीलच काही मुद्दे वचननाम्यात मांडले आहे. मुंबईत कोस्टल रोड तयार करणे, मुंबईच्या सौंदर्यीकरणावर भर, महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क, विद्यार्थ्यांना मोफत टॅब, अत्याधुनिक आरोग्य सेवा, बिझनेस, ऍग्रीकल्चर हब उभारणार अशी आश्वासनं देण्यात आलीये.

शिवसेनेचा वचननाम्यातील प्रमुख मुद्दे

- नवे गृहनिर्माण धोरण, SRA योजना संपूर्ण राज्यात राबवणार

- वर्षभरात पोलीस खात्यातील सर्व रिक्तपदांची भरती, महिलांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना

- शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी इंद्रधनुष्य योजना

- ट्रान्स हार्बर लिंक, सागरी वाहतूक प्रकल्प राबवणार / नवीन विद्युत प्रकल्प उभारणार / शिवप्रकाश योजनेद्वारे सौरउर्जेचा वापर

- ग्रामीण बांधवांचं जीवन सुसह्य करणार्‍या सात नव्या योजना

- स्वयंपूर्ण औद्योगिक नगरांची स्थापना, तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी

- सीआरझेड 2 मधील अव्यवहार्य, जाचकनियमबदल करणार

- प्रलंबित असलेले, अपारंपारिक वीजेचे प्रकल्प गतीशिल करणार

- शहर विकास नियंत्रण नियमाखाली 5 वर्ष सातत्य ठेवणार

- विकास नियंत्रण नियमाखाली मंजूर झालेले प्रकल्प जुण्याच नियमावलीनुसार ओ.सी. देणार

- हेरिटेज कायद्यातील जाचक अटी शर्ती शिथील करणार

- एसआरए योजना पूर्ण राज्यात राबणार, यासाठी कायद्यात सुधारणाही करणार

- झोपडपट्टीधारक क्लस्टर योजनेतील लाभधारकांना 400 चौ. फुटाचे घर देणार

- सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी नवे धोरण तयार करणार

- मुंबईत डबेवाल्यांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबांना आरोग्य सेवा आणि विमा योजणा राबवण्यास प्राधाण्य देणार

- महामार्गावर अपघातातील जखमींच्या उपचारासाठी ट्रामा सेंटर उभारणार

- मुंबई, नवी मुंबई जल वाहतूक सेवा सुरू करणार

- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार

- कोस्टल रोड तयार करणार

- मुंबईच्या सौंदर्यीकरणावर भर

- महालक्ष्मी रेसकोर्स थीम पार्क उभारणार

- समुद्रकिनार्‍यांचं सौंदर्यीकरण

- बिझनेस, ऍग्रीकल्चर हब बनवणार

- विद्यार्थ्यांना मोफत टॅब देणार

- अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवणार

- व्हर्च्यअल क्लासरूम महाराष्ट्रात राबवणार

- नवी मुंबई विमानतळ पूर्ण करणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2014 01:24 PM IST

ताज्या बातम्या