सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे !

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे !

  • Share this:

sunanda pushkar drug overdose_0_0_0

10 ऑक्टोबर :  माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचा, अहवाल एम्स हॉस्पिटलच्या टीमने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे सुनंदा यांच्या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे.

सुनंदा पुष्कर यांचा फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील लीला या फाईव्हस्टार हॉटेलच्या रुममध्ये मृतदेह आढळला होता. त्यांच्या मृत्यूचा अंतिम पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तणावाविरोधी औषधांच्या अतिसेवनांनं त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं होतं. तर त्यांच्या शरीरावर 12 हून जास्त जखमा असल्याचा निष्कर्षही अहवालात नमूद करण्यात आला आहे, पण या जखमाच्या खुणा प्राणघातक नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. पण आता सुनंदा पुष्कर यांच्या शेवटच्या व्हिसेरा रिपोर्टनुसार त्यांना विषबाधा झाल्याचं उघड झालं आहे. त्यांचा मृतदेह ज्या रूममध्ये सापडला होता त्या रूममध्ये औषधांबद्दल कोणतीही अधिक माहिती मिळालेली नाही, ही औषधं त्यांनी कोणत्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतली याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या बाबतचा अहवाल दिल्ली पोलिसांना मिळाला आहे पण या प्रकरणी त्यांनी अजून कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, यासंदर्भात शशी थरूर यांनी सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2014 12:02 PM IST

ताज्या बातम्या