भाजपचे 'काही' नेते पंतप्रधानांची फसवणूक करत आहेत - आदित्य ठाकरे

भाजपचे 'काही' नेते पंतप्रधानांची फसवणूक करत आहेत - आदित्य ठाकरे

  • Share this:

NEWS

10 ऑक्टोबर :  शिवसेना - भाजपची 25 वर्ष जुनी युती तुटण्यासाठी कारणीभूत असलेले राज्यातील भाजपचे दोन - चार नेते केवळ जनतेचीच नव्हे तर पंतप्रधानांचीही फसवणूक करत आहे असा आरोप युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जळगावमध्ये केला. गेल्या 30 वर्षांपासून जळगावचे आमदार असलेले सुरेश जैन यंदा शिवसेनेतर्फे तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी जळगावात गुरूवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या व्यक्तींनी बांधलेली युती हा महाराष्ट्राच्या जनतेचा जिव्हाळ्याचा विषय होता. ही युती टिकली पाहिजे हेच आमचे ध्येय होते, म्हणून आम्ही प्रयत्नदेखील केले. मात्र, राज्यातले काही भाजप नेते युती तोडण्यासाठी आतूर होते, असा आरोपही आदित्य यांनी नाव न घेता केला. 25 वर्षं ज्यांना आपण भाऊ समजत होतो, त्यांनीच पाठीत वार केला आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला. जनता विकासाची महायुती तोडण्यास जबाबदार असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा दावाही त्यांनी केला. तसेच मोदींबाबत अजूनही आदर असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Follow @ibnlokmattv

First published: October 10, 2014, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading